…गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )दि 6ऑक्टोबर :- – बुद्ध, फुले, शाहू,डॉ आंबेडकर यांचे बहुजन वादी,परिवर्तनवादी विचार ग्रंथ विक्रीद्वारे घराघरात पोहचवण्याचे कार्य एक युवक करीत आहे.. नरेश वनकर असे या युवकाचे नाव आहे. -मूल तालुक्यातील चिरोली हे त्याचे मूळ गाव असून सध्या चंद्रपूर येथे जयंत टॉकीज च्या मागच्या भागात त्याचे वास्तव्य आहे.प्रस्तुत प्रतिनिधिने नुकतीच त्याच्या निवासस्थानी त्याची भेट घेतली..—त्याच्या तीनही खोल्या केवळ पुस्तकांनी व्यापल्या आहेत.. बुद्ध, फुले, शाहू, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे परिवर्तनवादी साहित्य सोबतच आदिवासी साहित्य, विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके, कायद्याची पुस्तके, व्यक्तिमत्व विकासाची पुस्तके.. आदि…–एकंदरीत नरेश च्या ग्रंथालयात मानवी जीवन उंचावणारी, घडवणारी, जीवनात सुख शांतीचे बिज रोवणारी आणि फुलवणारी ग्रंथ संपदा बघायला मिळाली.-चंद्रपूर जिल्यात आणि अनेकदा जिल्हाच्या बाहेरही प्रत्येक आंबेडकरी कार्यक्रमात नरेश वनकरचा ग्रंथाचा स्टॉल लागलेला असतो..एखादे पुस्तक उपलब्ध नसेल तर तो मागवून गरजू वाचकांना उपलब्ध करून देतो..– नरेश नुसता ग्रंथ विक्रेता नाही तर चोखंदळ वाचक ही आहे.. बुद्ध विचार जीवनात उतरवले तर जीवन सुसह्य, सुकर, सुखी होते.. जीवनात शांती निर्माण होते..सुकून येतो असं तो अनुभवातून सांगतो..–सध्याच्या डिजिटल युगात विशेषतः युवा पिढीत ग्रंथ वाचनाचे प्रमाण कमी झाल्याची खंत व्यक्त करून तो पुढे म्हणतो, असे असले तरी मूळ ग्रंथ वाचणारे वाचक आजही मोठया प्रमाणावर आहेत..कुणी फोन वर ऑर्डर दिली की घरपोच ग्रंथ पोचवून देण्याची सेवा तो करीत आहे.–घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याने बारावी पर्यंतच शिक्षण घेतले आहे.. पण तो मुलांना उच्च शिक्षण, उच्च संस्कार देत आहे.केवळ ग्रंथासाठी त्याने 3रूम भाड्याने घेतल्या असून ‘मध्यम बुक सेलर’ असा बोर्ड टांगला आहे.








